गोवा सहकार संघ निवडणुकीत सहकार विकास मंच पॅनेलचे वर्चस्व

पॅनेलचे ८ संचालक विजयी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May, 11:12 pm
गोवा सहकार संघ निवडणुकीत सहकार विकास मंच पॅनेलचे वर्चस्व

पणजी : गोवा राज्य सहकार संघाच्या निवडणुकीत सहकार विकास मंच पॅनेलचे ८ संचालक निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहकार विकास मंच पॅनेलचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. विजयानंतर संचालकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी नवीन संचालकांचे अभिनंदन करताना सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा सल्ला दिला.
२०२६-२७ ते २०३०-३१ या काळातील संचालक मंडळासाठी निवडणूक होऊन मंगळवारी निकाल जाहीर झाले.
निवडून आलेले संचालक :
कृषी क्रेडिट सोसायटी : दीपक गावस, नारायण कामत, फ्रान्सिस मास्करेन्हास, संकेत नाईक मुळे.
डेअरी सहकारी सोसायटी : विजयकांत गावकर, गोविंद नाईक.
ग्राहक सहकारी सोसायटी : संदेश नारायण मांद्रेकर.
नोकरदार सहकारी सोसायटी : रमेश गावस, संजय मांद्रेकर.
बहुउद्देशीय सहकारी सोसायटी : मशाल आडपईकर.
सहकारी बँक फेडरेशन : दामोदर नाईक.
गृहनिर्माण सहकारी सोसायटी : दिलीप बोरकर.
यापैकी दीपक गावस, नारायण कामत, फ्रान्सिस मास्करान्हस, विजयकांत गावकर, रमेश गावस, संजय मांद्रेकर, दामोदर नाईक, दिलीप बोरकर हे सहकार विकास मंच पॅनेलचे उमेदवार आहेत.

हेही वाचा