अपघातानंतर चालक वाहनासहीत पळाला

पणजी : मडगावहून कुंकळ्ळीकडे जाणाऱ्या भरधाव ‘थार’ वाहनाने एका महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहन घेऊन अपघातस्थळावरून पळून गेला.
अपघातानंतर जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (GMC) दाखल करण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती गोमेकॉतून मिळाली.
दरम्यान, मडगाव पोलिसांनी (Margao Police) घटनास्थळी पंचनामा करून या हिट-अँड-रन (Hit-and-Run) प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी तपास मोहीम राबविण्यात येत आहे.