मळकर्णेत ‘किंग कोब्रा’नंतर घरात आलेला कोब्रा पकडला

दोन दिवसांपू्र्वीच ‘किंग कोब्रा पकडण्यात आला होता; स्थानिकांमध्ये घबराट

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मळकर्णेत ‘किंग कोब्रा’नंतर घरात आलेला कोब्रा पकडला

पणजी : केपे तालुक्यातील (Quepem Taluka)  मळकर्णे येथे विषारी सापांचे दर्शन अधूनमधून घडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच मळकर्णे येथे पंचायत परिसरात साडेचार मीटर लांबीचा ‘किंग कोब्रा’ (King Cobra)  पकडण्यात आला होता. त्यानंतर आज सकाळी एका घरात घुसलेला ‘कोब्रा’ (Cobra) पकडण्यात आला. 

मळकर्णे (Molcornem) येथील जैसन रिबेलो (Jaison Rebello)  यांच्या घरात घुसून या विषारी सापाने कोंबडीची पिल्ले खाल्ली. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घरातील मंडळींना साप दिसला.  त्यांनी स्थानिक पंच सदस्य फ्लेझर दा कॉस्ता (Flazer Da Costa, Panch Member)  यांना माहिती दिली. त्यांनी वन खात्याला माहिती दिल्यानंतर सर्पमित्राने येऊन सापाला पकडले. 

सर्पमित्र आणून सोडत असल्याचा संशय

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वीच मळकर्णे पंचायत परिसरात साडेचार मीटर लांबीचा ‘किंग कोब्रा’ पकडण्यात आला होता. त्यानंतर आता ‘कोब्रा’ पकडण्यात आल्याने परिसरात घबराट पसरली आहे.  कुणीतरी सर्पमित्र पकडलेले साप याठिकाणी सोडत असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वन खात्याने सर्पमित्रांमध्ये जागृती करून पकडलेले साप नागरी वस्तीपासून दूर सोडण्यासंदर्भात सर्पमित्रांमध्ये जागृती करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा