दुचाकी-ट्रक यांच्यातील अपघातात एक ठार

समोरासमोर धडक : नानोडा येथे अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
1 hours ago
दुचाकी-ट्रक यांच्यातील अपघातात एक ठार

डिचोली : अस्नोडा ते दोडामार्ग या मुख्य रस्त्यावर सेलेब्रेशन रेस्टॉरंटजवळ ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. शुक्रवार दि. २२ मे रोजी संध्याकाळी अपघात घडला.

जीए ०४ आर ४२४४ या क्रमांकाच्या दुचाकीवरून नानोडा येथील प्रशांत लाडू केरकर हा युवक अस्नोडा येथून नानोडाच्या दिशेने जात होता. तर जीए ०३ व्ही ९९५६ हा ट्रक दोडामार्ग ते मुळगाव येथे जात असताना नानोडा येथे सेलिब्रेशन रेस्टॉरंटजवळ रस्त्यावर दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली.

धडकेत दुचाकीचालक प्रशांत लाडू केरकर हा गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने डिचोली येथे सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

डिचोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला. या प्रकरणी उपनिरीक्षक जयप्रकाश जनकर अधिक तपास करीत आहेत.