कुडणे-साखळी येथील महिलेच्या खूनप्रकरणातील संश‌यिताला महाराष्ट्रातून आणले गोव्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
कुडणे-साखळी येथील महिलेच्या खूनप्रकरणातील संश‌यिताला महाराष्ट्रातून आणले गोव्यात

पणजी : कुडणे-चिकणे, साखळी येथील शैला घाडी यांना मारहाण करून हत्या (Murder)  केल्याच्या आरोपाखाली फरार असलेला संशयित सागर राऊळ याला महाराष्ट्रात अटक करून गोव्यात आणले. काल त्याला महाराष्ट्रात अटक करण्यात आली होती. आज सकाळी पोलीस त्याला घेऊन गोव्यात पोहोचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैला घाडी यांच्या हत्येनंतर संशयित सागर राऊळ फरार झाला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत महाराष्ट्रात (Maharashtra)  त्याचा माग काढला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले.

या खून प्रकरणातील नेमके कारण, घटनेमागील पार्श्वभूमी आणि इतर संबंधित बाबींचा पोलिसांकडून (Goa Police)  सखोल तपास सुरू असून, आरोपीची चौकशी करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सागर राऊळ हा अधूनमधून घाडी कुटुंबियांच्या घरी येत होता. यापू्र्वी त्याने एकदा त्यांच्या घरातील साहित्याची तोडफोड केली होती. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करीत आहेत. 

हेही वाचा