
पणजी : साखळी येथील चिखणे-कुडणे भागात ५८ वर्षीय शैला घाडी या महिलेची निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवत ३४ वर्षीय संशयित सागर राऊळ याला अटक केली आहे.
संशयिताने पीडित महिलेच्या लहान मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, शैला घाडी यांनी या विवाह प्रस्तावाला ठाम विरोध केला. याच रागातून संशयिताने हे टोकाचे पाऊल उचलत त्यांची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर संशयिताने मृत महिलेच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पळ काढला होता. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सुमारे १.११ लाख रुपये किमतीचा चोरलेला ऐवज जप्त केला आहे. डिचोली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे.