
पणजी : पेडणे तालुक्यातील (Pernem Taluka) मांद्रे येथील स्टोन वूड रिसॉर्टमधून पर्यटक महिलेच्या खोलीतून सोन्याचे दागिने पळविले. याप्रकरणी मांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पर्यटक महिलेने खोलीत ठेवलेल्या बॅगेतून सोन्याचे दागिने पळविल्याची तक्रार केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील सुनीता कपूर यांनी वरील तक्रार दाखल केली होती. ११ ते १२ मे २०२६ दरम्यान त्या मांद्रे येथील स्टोन वूड रिसॉर्टच्या रूम क्रमांक २८ मध्ये वास्तव्यास होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खोलीत प्रवेश करून सूटकेसमध्ये ठेवलेले त्यांच्या दिवंगत आईची सुमारे ३४.९९२ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले चोरून नेली.
ही घटना १९ मे रोजी रात्री उशीरा उघडकीस आल्यानंतर मांद्रे पोलीस (Mandrem Police) स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण देसाई करीत आहेत.