
कुळें: फोंडा येथून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह कुळेनजीक दूधसागर नदीत शनिवारी तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून सध्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.