
मडगाव: आके-बायश ग्रामसभेत कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून माजी सरपंच सिद्धेश भगत आणि सचिव संदीप हळयाळी यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक उडाली. नावेली आणि आके-बायश येथील गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित असलेल्या या विषयावर सचिवाने दिलेले उत्तर भगत यांनी अमान्य करत ते पत्र भरसभेत फाडून टाकले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जोसेफ वाझ यांनीही बीडीओकडे केलेल्या तक्रारींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला. या गदारोळानंतर ग्रामसभेत 'स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर'ला विरोध करणारा ठराव एकमुखाने संमत करण्यात आला.
बातमी अपडेट होत आहे.