फोंड्यातील विचित्र योगायोगाची चर्चा; १५ महिन्यांत १५ तारखेलाच तीन नेते गमावले!

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
18 mins ago
फोंड्यातील विचित्र योगायोगाची चर्चा; १५ महिन्यांत १५ तारखेलाच तीन नेते गमावले!

पणजी : फोंडा मतदारसंघात गेल्या १५ महिन्यांत घडलेल्या एका विलक्षण योगायोगाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, तीन वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे निधन महिन्याच्या १५ तारखेलाच झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फिजिओथेरपिस्ट तथा फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली निधनानंतर यावर चर्चा होऊ लागली आहे.

माजी आमदार लवू मामलेदार (Lavoo Mamledar) यांची १५ फेब्रुवारी २०२५ रोजी शुल्लक कारणावरून बेळगाव येथे हत्या झाली होती. त्यानंतर, राज्याचे कृषीमंत्री रवी नाईक (Ravi Naik) यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीक (Dr. Ketan Bhatikar)  यांचा १५ मे २०२६ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

विच‌ित्र योगायोग

विशेष म्हणजे, तिन्ही मृत्यू फोंडा मतदारसंघाशी (Ponda assembly constituency)  संबंधित नेत्यांचे आहेत.  तेही महिन्याच्या १५ तारखेलाच घडल्याने हा केवळ एक विचित्र योगायोग असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. १५ तारखेलाच घडलेल्या तिन्ही घटनांमुळे फोंडासहीत गोवाभर हळहळ व्यक्त केली जात आहे.  राजकीय वर्तुळातही या योगायोगाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा