हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा विधी करणे अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय

हिंदू धर्म ही ‘जीवनपद्धती’

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20 mins ago
हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा विधी करणे अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय

पणजी :  सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India)  महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत हिंदू धर्म ही केवळ धार्मिक पद्धती नसून “जीवन जगण्याची एक पद्धत” असल्याचे म्हटले आहे. एखादी व्यक्ती हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा विशिष्ट धार्मिक विधी करणे आवश्यक आहे असे नाही; असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 बुधवारी मुख्य न्यायमूर्ती सूर्य कांत (Surya Kant ) यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने सुनावणीदरम्यान, “घरात दिवा लावणे देखील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे,” असे निरीक्षण नोंदवले.

महिलांविरोधातील धार्मिक स्थळांवरील भेदभाव, विशेषतः सबरीमला मंदिर (Sabarimala Temple) प्रकरण तसेच विविध धर्मांतील धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. यात दाऊदी बोहरा ( Dawoodi Bohra) समुदायाशी संबंधित मुद्द्यांचाही समावेश आहे.

या घटनापीठात न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना, एम. एम. सुंदरेश, अहसानुद्दीन अमानुल्ला, अरविंद कुमार, ऑगस्टीन जॉर्ज मसीह, प्रसन्न बी. वराळे, आर. महादेवन आणि जॉयमाल्या बागची यांचा समावेश आहे.

हेही वाचा