ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जागतिक नेते भारतात दाखल

इराण, रशियासहीत अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी जागतिक नेते भारतात दाखल

नवी दिल्ली: ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या (BRICS Foreign Ministers’ Meeting) पार्श्वभूमीवर रशिया (Russia), इराण (Iran), ब्राझील, थायलंड, क्युबा, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, मलेशिया, मालदीव, व्हिएतनाम, उझबेकिस्तान आणि चिली यांसह अनेक देशांचे परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ राजनैतिक अधिकारी भारतात (India) दाखल झाले आहेत. या उच्चस्तरीय बैठकीत जागतिक सुरक्षा, आर्थिक सहकार्य, बहुपक्षीय राजनैतिकता आणि 'ग्लोबल साउथ' सोबतची भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले जाण्याची शक्यता आहे.

कार्यसूचीवर काय आहे?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, या बैठकीची संकल्पना “लवचिकता, नवे उपक्रम, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी” ही आहे. यामध्ये “लोककेंद्रीत आणि सर्वांगीण आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रीत केले जाईल.  तसेच संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांसह गंभीर आरोग्य आव्हानांवर सहकार्यावर भर दिला जाईल,” असेही त्यात म्हटले आहे.

तथापि, इराणवरील सुरू असलेले युद्धच चर्चेत वर्चस्व गाजवेल आणि या चर्चेतून सप्टेंबरमधील वार्षिक ब्रिक्स शिखर परिषदेची कार्यसूची निश्चित होईल, असे निरीक्षकांचे म्हणणे आहे.

ब्रिक्स शिखर परिषदेवर इराण युद्धाची छाया

“इराण युद्धाची छाया ब्रिक्स शिखर परिषद आणि ट्रम्प-शी जिनपिंग यांच्या भेटीवर पडण्याची शक्यता आहे,” असे युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे (ECFR)  संरक्षण, सुरक्षा आणि तंत्रज्ञान विभागाचे धोरण अभ्यासक राफेल लॉस यांचे म्हणणे आहे. 

इराणवरील युद्धाचा गुरुवारी ७६ वा दिवस उजाडला असून, हा संघर्ष संपवण्यासाठीचे राजनैतिक प्रयत्न अधांतरी आहेत.

अराघची घेणार स्वतंत्र बैठक 

इराण वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार;  मुख्य ब्रिक्स सत्रांमध्ये सहभागी होण्यासोबतच, अराघची हे भारतीय परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर आणि बैठकीला उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेणार आहेत.

या वर्षी एप्रिलमध्ये, भारताने नवी दिल्लीत ब्रिक्स उप-परराष्ट्र मंत्री आणि मध्य पूर्व व उत्तर आफ्रिकेसाठी विशेष दूतांच्या बैठकीचे आयोजन केले होते. इराणवरील अमेरिका-इस्रायलच्या युद्धाला कसे सामोरे जावे यावरून इराण आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यात मतभेद झाल्याने ती बैठक कोणत्याही संयुक्त निवेदनाशिवाय संपली.  तसेच युएई स्वतःला इराणी आक्रमकतेचा बळी मानत होते. तेव्हापासून, इराण आणि युएई मधील तणाव वाढला आहे.  आणि तेहरानच्या युद्धविषयक संदेशांमधून युएईला अधिकाधिक लक्ष्य केले जात आहे.

इस्रायलचे गाझावरील नरसंहारक युद्ध

इस्रायलचे गाझावरील नरसंहारक युद्ध हा देखील या गटातील तणावाचा आणखी एक मुद्दा आहे. 

हेही वाचा