गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ

पणजी : गोवा सरकारने (Goa Government)  सरकारी तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थांतील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत महागाई भत्त्यात (डीए) (Dearness Allowance)  २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा डीए ५८ टक्क्यांवरून थेट ६० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

ही वाढ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात आली असून, त्या कालावधीतील थकबाकी कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयामुळे हजारो कर्मचारी आणि शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा