मनोज परब यांची सोशल मिडियावरून स्वत:च्या पदाधिकाऱ्यांवर कठोर टीका

पणजीः रेव्ह्युलेशनरी गोवन्स पक्षाचा (आरजीपी) (Revolutionary Goans Party) अंतर्गत वाद सोशल मिडियावर गाजू लागला आहे. पक्षाचे सुप्रिमो मनोज पबर यांनी सोशल मिडियावर आरजीपीच्या काही पदाधिकाऱ्यांवर बरीच टीका केली आहे. यातील बरेच पदाधिकारी हे सांत आंन्द्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या जवळचे आहेत. परब यांनी सोशल मिडियावर घातलेल्या पोस्टनुसार आरजीत फूट पडून दोन गट तयार झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मनोज यांच्या गटाच्या समर्थकांनी बोरकर यांच्या समर्थकांकडून स्पष्टीकरण मागण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आरजी पक्षात भांडण सुरू आहे. आरजीपीचे आगशीचे पंच जुलियस आल्मेदा यांना आरजीपीच्या कोअर कमिटीने पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षातून बाहेर काढले होते. कोअर कमिटीच्या या निर्णयामुळे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर निराश होते. हा वाद गेले महिनाभर आतल्याआत शिजत होता आणि वीरेश बोरकर यांनी पक्षात सर्व काही चांगले असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला होता.
पण मंगळवारी सकाळी मनोज परब यांनी सोशल मिडियावर (Social Media) वादग्रस्त पोस्ट टाकणे चालू केले. आरजीपीचे उत्तर गोवा सरचिटणीस आणि सांत आंन्द्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचे सहकारी लिसियो रोन्कोन यांच्याविरुद्ध पक्षाचे सुप्रिमो मनोज परब यांनी सोशल मिडियावर टीका सुरू केली. सासष्टीतले डॅगली फर्नांडिस आणि बार्देशचे मायकल क्वेरोज यांनाही आव्हान देणे सुरू केले. धर्माच्या आधारावर हे तिघेही ब्रॅनवॉश करतात असा आरोप परब यांनी केला. अध्यक्षपद हवे होते, पक्ष हवा होता तर मला सांगायचे होते; असाच काढून दिला असता; जीवन दिले पक्षासाठी, पद कसले. मनोजने असे रहायला हवे, तसे बोलायला हवे, हे करायला हवे, ते नको. मुलगी देता काय मला तुमची? वडिलांना मुले जन्माला घालायला शिकवायचे नसते... आठवण ठेवा अशा कठोर शब्दांत मनोज यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांवर टीका केली. आल्मेदा यांना काढल्यावर आरजीत वाद उफाळून येऊन दोन गट झाले आहेत. एक गट मनोज परब (Manoj Parab) यांचे समर्थन करतो तर दुसरा गट आमदार वीरेश बोरकर यांचे समर्थन करतो. फेसबुकवर मनोजने बोरकर यांच्या समर्थकांना लक्ष्य केले आहे आणि मनोजला त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळत आहे. तसेच बोरकर यांचे समर्थक आमचे ब्रॅनवॉश करतात असाही आरोप मनोज समर्थकांनी फेसबुवकर केला आहे. लिसीयो यांनी आरजीपीचे सर्व इमेल एका मिडिया चॅनलला लीक केले आहेत. वीरेश बोरकर यांनी या विषयी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान मनोज यांच्या जवळचे विश्वेश नाईक यांनी दिले आहे.
वीरेशबाबत काँग्रेसकडून प्रतिक्रीया देण्यास नकार
आरजीचे आमदार वीरेश बोरकर (Viresh Borkar) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? यावर प्रतिक्रीया देण्यास प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर व खासदार विरियातो फर्नांडिस यांनी नकार दिला आहे.