चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर भरधाव बोलेरो उलटली; चालक थोडक्यात बचावला

धोकादायक स्टंट करणाऱ्या युवकांना वाचवताना अपघात; चालकाचा दावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12th May, 02:33 pm
चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर भरधाव बोलेरो उलटली; चालक थोडक्यात बचावला

 वास्को : चिखली-दाबोळी विमानतळ मार्गावर (Dabolim Airport road) भरधाव वेगातील बोलेरो (Bolero) वाहन अचानक उलटल्याची घटना घडली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुदैवाने सुखरूप बचावला.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर काही युवक धोकादायक स्टंट (Stunt) करत असल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी भरधाव बोलेरोवरील नियंत्रण सुटून वाहन रस्त्यावर उलटले. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून; पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा