
म्हापसा : खोर्जुवे-हळदोणा परिसरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत फिलिप वाझ यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत घरातील फर्निचर, विद्युत उपकरणे तसेच इतर घरगुती साहित्य जळून खाक झाली. सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. म्हापसा अग्निशमन दलानेही (Mapusa Fire Station) वेळीच घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याचे समोर आले असून; पुढील तपास सुरू आहे.