आंबा आईस्क्रीम

Story: चमचमीत रविवार |
02nd May, 11:17 pm
आंबा आईस्क्रीम

​वर्षातून एकदाच लागणारं फळ म्हणजे आंबा. उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट, मसालेदार पदार्थ नको असतात. पण या दिवसात थंडगार आंब्यापासून पदार्थ मिळाला तर...!

​साहित्य:

​स्वच्छ धुवून, गर काढून घेतलेले २ आंबे.

​गोडीनुसार साखर.

​१ कप फ्रेश क्रीम.

​१ कप दूध.

​१ बारीक चमचा वेलची पूड.

​१ बारीक वाटी बदाम आणि पिस्त्याचे काप.

​कृती:

एका मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा गर आणि साखर टाकून गुळगुळीत प्युरी बनवा. आता एका भांड्यात हा गर काढून क्रीम आणि दूध घालून हे मिश्रण एकत्र करा. तुम्हाला बाहेरची क्रीम नको असल्यास ४ ते ५ दिवसांची दुधावरची साय घालू शकता. वास छान येण्यासाठी वेलची पूड घाला. आता हे सगळं मिश्रण छान एकत्र करा. मग मिश्रण एअरटाइट डब्यात टाका. आता वरून बदाम आणि पिस्त्याचे काप टाका. एक पूर्ण रात्रीसाठी फ्रीजरमध्ये ठेवा.


- संचिता केळकर