कुचेलीतील मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर खूनाचा गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
1 hours ago
कुचेलीतील मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालानंतर खूनाचा गुन्हा नोंद

म्हापसा : खडपावाडा, कुचेली येथील सुभाष रामा नाईक (वय ६१) यांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल नाईक यांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून (Postmortem)  संशयास्पद बाबी उघडकीस आल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणी पुढील तपास म्हापसा पोलीस (Mapusa Police)  करत असून, मृत्यूमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत झाली आहेत.

हेही वाचा