कामगार दिनानिमित्त फोंड्यात मोर्चा

‘कामगार शक्ती धोरण’ मागे घेण्याची मागणी


8 mins ago
कामगार दिनानिमित्त फोंड्यात मोर्चा

कामगार दिनानिमित्त आयोजित मोर्चात सहभागी झालेले कामगार.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : फोंडा येथे शुक्रवारी सकाळी कामगार दिनाच्या निमित्ताने सीआयटीयुच्या कामगारांनी मोर्चा काढला. तिस्क- फोंडा ते वारखंडे येथील हनुमान मंदिरापर्यत मोर्चा काढण्यात आला. हनुमान मंदिरात कामगारांची सभा झाली. अंदाजे २०० पेक्षा अधिक कामगार यावेळी उपस्थित होते.
भारतातील कामगारांच्या हक्कांवर आणि उपजीविकेवर यावर्षी सरकारने अभूतपूर्व हल्ला केला आहे. चार ‘श्रम संहिता’ रद्द करून २९ कामगार कायदे पुनर्स्थापित करावे, अशी मागणी कामगार वर्गातर्फे करण्यात आली असल्याचे जतीन नाईक यांनी सांगितले. निळकंठ फडते यांनी ‘कामगार शक्ती धोरण’ तत्काळ मागे घेऊन चार कामगार कायदे रद्द करण्याची मागणी केली. ‘जन सुरक्षा अधिनियम’ रद्द करा, तसेच किमान वेतन २६ हजार रुपये करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.      

हेही वाचा