धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

एकाच्या शोधासाठी पोलीस विदेशात होणार रवाना

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
40 mins ago
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी

पणजी : गोव्यातील (Goa) म्हापसा, डिचोली आणि फोंडा पोलिसांनी (Mapusa, Bicholim, Ponda Police) सोशल मीडियावर (Social media)  आक्षेपार्ह व अवमानकारक टिप्पणी करून धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध लुकआऊट नोटीस (Look out notice) जारी केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार; बाबिट फर्नांडिस, चॅल्सेआ आणि मास्कारेन्हस (पूर्ण नावे अद्याप समोर आलेली नाहीत) यांनी फेसबुक आणि इतर सोशल मीडिया पोस्टवर वादग्रस्त टिप्पणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच्या शोधासाठी गोवा पोलीस विदेशात रवाना होणार आहेत. 

तिन्ही पोलिस ठाण्यांनी समन्वयाने कारवाई करत आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी लुकआऊट नोटीस जारी केली आहे. तसेच, नागरिकांना कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून; लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा