टी-२० इतिहासातील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली : दिल्लीच्या रणरणत्या उन्हात आणि अरुण जेटली स्टेडियमच्या मैदानात शनिवारी क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा चमत्कार घडला. दिल्ली कॅपिटल्सने उभारलेल्या २६४ धावांच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना, पंजाब किंग्सने आपल्या फलंदाजांच्या जोरावर आयपीएल आणि टी-२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करून विश्वविक्रम नोंदवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पथुम निसांका ११ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर केएल राहुल आणि नितीश राणा यांनी पंजाबच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या ९६ चेंडूत २२० धावांची भागीदारी केली. केएल राहुलने ४७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि तो ६७ चेंडूत १५२ धावांवर नाबाद राहिला. नितीश राणानेही फटकेबाजी करत ९१ धावांची खेळी केली. झेवियर बार्टलेटच्या एकाच षटकात त्याने २८ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने एक अप्रतिम झेल घेत त्याची ही खेळी संपुष्टात आणली. दिल्लीने निर्धारित २० षटकात २६४ धावांचा डोंगर उभा केला.
२६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी पहिल्या चेंडूपासूनच हल्ला चढवला. तिसऱ्या षटकात प्रियांशचा झेल घेण्याच्या प्रयत्नात दिल्लीचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी डोक्यावर आपटला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून मैदाबाहेर नेण्यात आले. प्रभसिमरनने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पंजाबने पॉवरप्लेमध्ये ११६ धावा कुटल्या, जो आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोर ठरला. सलामी जोडी बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी कर्णधार श्रेयस अय्यरने स्वीकारली. श्रेयस अय्यर २८ आणि ३५ धावांवर असताना करुण नायरने त्याचे दोन सोपे झेल सोडले. हे जीवदान दिल्लीला चांगलेच महागात पडले. श्रेयसने २६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि ३६ चेंडूत ७१ धावांवर नाबाद राहत पंजाबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्याला शशांक सिंगने (१७) चांगली साथ दिली.
आयपीएलमधील पॉवरप्लेमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
८७ (२५ चेंडू) : सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्स) विरुद्ध पंजाब, मुंबई (वानखेडे), २०१४ (पात्रता फेरी २)
८४ (२६ चेंडू) : ट्रेव्हिस हेड (सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२४
७८ (२४ चेंडू) : जेक फ्रेझर-मॅकगर्क (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध मुंबई, दिल्ली, २०२४
७४ (२५ चेंडू) : ॲडम गिलख्रिस्ट (डेक्कन चार्जर्स) विरुद्ध दिल्ली, सेंच्युरियन, २००९ (उपांत्य फेरी)
७१ (२३ चेंडू) : प्रभसिमरन सिंग (पंजाब किंग्स) विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२६
आयपीएलमध्ये पॉवरप्लेमध्ये १०० पेक्षा जास्त धावा
१२५/० : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२४
११६/० : पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२६
१०७/० : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ, हैदराबाद, २०२४
१०५/० : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब, मुल्लानपूर, २०२६
१०५/० : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, २०१७
१००/२ : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब, मुंबई (वानखेडे), २०१४
पंजाब किंग्ससाठी सर्वात जलद आयपीएल अर्धशतके
१४ चेंडू : केएल राहुल विरुद्ध दिल्ली, मोहाली, २०१८
१६ चेंडू : प्रियांश आर्य विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, मुल्लानपूर, २०२६
१७ चेंडू : निकोलस पूरन विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, दुबई, २०२०
१८ चेंडू : प्रभसिमरन सिंग विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, कोलकाता, २०२४
१८ चेंडू : प्रभसिमरन सिंग विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२६
टी-२० मधील भारतीयांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
१५२ : केएल राहुल विरुद्ध पंजाब, दिल्ली, २०२६
१५१ : तिलक वर्मा विरुद्ध मेघालय, राजकोट, २०२४
१४८ : अभिषेक शर्मा विरुद्ध बंगाल, सिकंदराबाद, २०२५
१४७ : श्रेयस अय्यर विरुद्ध सिक्कीम, इंदूर, २०१९
१४६ : पुनीत बिष्ट विरुद्ध मिझोराम, चेन्नई, २०२१
पंजाब किंग्ससाठी सर्वात महागडी गोलंदाजी
१/६९ - झेवियर बार्टलेट विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२६
०/६६ - मुजीब उर रहमान विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, हैदराबाद, २०१९
१/६६ - अर्शदीप सिंग विरुद्ध मुंबई, मोहाली, २०२३
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा
८९८९ : विराट कोहली
७१८३ : रोहित शर्मा
६७६९ : शिखर धवन
६५६५ : डेव्हिड वॉर्नर
५५७९ : केएल राहुल
५५२८ : सुरेश रैना
५४३९ : एमएस धोनी
आयपीएलमध्ये ११-२० षटकांदरम्यान सर्वाधिक धावा
१७२/२ : आरसीबी विरुद्ध गुजरात लायन्स, बेंगळुरू, २०१६
१६२/२ : पंजाब विरुद्ध चेन्नई, कटक, २०१४
१६२/१ : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब, दिल्ली, २०२६
आयपीएलमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
१७५ : ख्रिस गेल (आरसीबी) विरुद्ध पुणे वॉरियर्स, बेंगळुरू, २०१३
१५८ : ब्रेंडन मॅक्युलम (कोलकाता नाईट रायडर्स) विरुद्ध आरसीबी, बेंगळुरू, २००८
१५२ : केएल राहुल (दिल्ली कॅपिटल्स) विरुद्ध पंजाब, दिल्ली, २०२६
१४१ : अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध पंजाब, हैदराबाद, २०२५
१४० : क्विंटन डी कॉक (लखनऊ सुपर जायंट्स) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, नवी मुंबई, २०२२