ट्रम्प यांनी इराण युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला

तणावात तात्पुरता दिलासा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
ट्रम्प यांनी इराण युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी इराणसोबतचा युद्धविराम संपण्याच्या एक दिवस आधीच तो अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे पुन्हा संघर्ष भडकण्याची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजाराला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

हा १० दिवसांचा युद्धविराम मागील शुक्रवारी (१७ एप्रिल २०२६) लागू झाला होता. मात्र, नव्या शांतता चर्चांमध्ये विलंब होत असल्याने अमेरिकेने हा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला. इराणकडून (Iran) अद्याप या घोषणेवर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही देशांनी करार न झाल्यास पुन्हा लढाई सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

निर्णयाचे स्वागत 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (International Atomic Energy Agency)  प्रमुख राफायल ग्रोस्सी  यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी सांगितले की, “युद्ध समाप्तीची प्रक्रिया गुंतागुंतीची असून; सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

हिजुबुल्ला, इस्त्रायलमध्ये गोळीबार सुरूच 

या पार्श्वभूमीवर, मध्यपूर्वेत तणाव कायम असून; हिजबुल्ला (Hezbollah) आणि इस्त्रायल (Israel) यांच्यात अधूनमधून गोळीबार सुरूच आहे. तरीही या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये आणखी चर्चेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्याच्या घडामोडींमुळे युद्ध टाळण्याचा प्रयत्न सुरू असला, तरी अंतिम शांतता करारासाठी अजूनही मोठे आव्हान उभे आहे.

हेही वाचा