सट्टाकिंग बाबू खेमानी अटकेत; 'महादेव ॲप'च्या धर्तीवर गोव्यातून चालत होता जुगार

गोव्यातील लोकेशन लपवण्यासाठी सिंडिकेटकडून चिनी सॉफ्टवेअरचा आणि बनावट आयडीचा वापर. नेमके कसे चालायचे काम, वाचा सविस्तर.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
सट्टाकिंग बाबू खेमानी अटकेत; 'महादेव ॲप'च्या धर्तीवर गोव्यातून चालत होता जुगार

रायपूर/पणजी: रायपूर क्राइम ब्रांचने ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याच्या एका आंतरराज्यीय महाजालाचा पर्दाफाश केला असून, याचे थेट धागेदोरे गोव्याशी जोडले गेले आहेत. या कारवाईत पोलिसांनी गोव्यातून ४ आरोपींना अटक केली असून, ते तिथे बसून सट्टा पॅनेल ऑपरेट करत असल्याचे समोर आले आहे. 'महादेव सट्टा सिंडिकेट'च्या प्रमोटर्सद्वारे संचालित रेड्डी अन्ना आणि FBBET77 सारख्या २१ सट्टा ॲप्सचे जाळे गोव्यातून पसरले होते.


बाबू खेमानी को रायपुर पुलिस ने मुंबई से गिरफ्तार किया।


छत्तीसगडमधील बेरोजगार तरुणांना दरमहा ३० ते ४० हजार रुपयांच्या पगाराचे आमिष दाखवून गोव्यातील विविध ठिकाणी ठेवले जात होते आणि त्यांच्याकडून पेमेंट गेट-वे आणि सट्टा पॅनेल चालवले जात होते. पोलिसांनी या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली असून, आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी चिनी सॉफ्टवेअरचा वापर करून वारंवार लोकेशन बदलत असल्याचे तपासात उघड झाले आहे.


बाबू खेमानी के साथ पकड़े गए 6 अन्य आरोपी।


या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाबू ऊर्फ गुलशन खेमानी याला मुंबईतून अटक करण्यात आली असली, तरी त्याच्या सिंडिकेटचे मुख्य केंद्र गोवा, मुंबई आणि पुणे ही शहरे होती. गोवा येथून लक्ष्मण ढ़ोबर, आशीष जाधव, रंजीत कुमार आणि वैभव खंडेलवाल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी महादेव ॲपच्या धर्तीवर ‘3 STUMPS’ नावाची वेबसाईट चालवत होते. विशेष म्हणजे, गोव्यातील या केंद्रांवरून केवळ सट्टा खेळवला जात नव्हता, तर सट्ट्याची रक्कम डिजिटल चलनात (बिटकॉइन) रूपांतरित करून ती श्रीलंका आणि चीनसारख्या देशांमध्ये पाठवली जात होती. गोव्यातील शांततेचा फायदा घेत हे सिंडिकेट आपले नेटवर्क विस्तारत होते, मात्र रायपूर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे या हाय-प्रोफाइल सट्टा नेटवर्कची कुंडली तयार करून मोठी कारवाई केली आहे.


पुलिस हिरासत में सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबू खेमानी।


तपासादरम्यान समोर आले की, बाबू खेमानी हा स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सादर करत असे. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरील आपल्या लोकप्रियतेचा वापर करून तो रसूखदार लोक आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. आयपीएल सामन्यांदरम्यान 'प्रिडिक्शन' आणि 'टिप्स' देण्याच्या नावाखाली तो लोकांना टेलिग्राम लिंकशी जोडत असे आणि तेथून त्यांना सट्टा जगतात प्रवेश मिळत असे. खेमानीने आपली प्रतिमा एका सेलिब्रिटीसारखी बनवली होती, जेणेकरून लोक त्याच्यावर सहज विश्वास ठेवतील. महागड्या गाड्या, परदेश दौरे आणि आलिशान पार्ट्यांचे फोटो टाकून तो आपली यशस्वी उद्योजक म्हणून खोटी प्रतिमा निर्माण करत असे. याच प्रतिमेच्या जोरावर त्याने रायपूरमधील रवि भवनमधील अनेक बड्या मोबाईल आणि कव्हर व्यावसायिकांना सट्ट्याच्या सिंडिकेटमध्ये सामील करून घेतले होते.


ऑनलाइन सट्टा पैनल और पेमेंट गेट-वे चलाने वाले इंटरस्टेट गिरोह का खुलासा।



महादेव सिंडिकेट अंतर्गत अनेक ऑनलाइन सट्टा पॅनेल सक्रिय असून, त्यात रेड्डी अन्ना, रेड्डी क्लब, FBBET77, CBFTE ऑनलाइन बुक, बेटभाई बुक, फेयरप्ले, सुपरविन, विनबज, जन्नत बुक, महाकाल बुक, राजवीर ऑनलाइन बुक, लोटस 365, लेजर बुक, कोहनूर बुक, अलीबाबा बुक, खेलोयार, एसडी बुक, लॉयन बुक, स्काईएक्सचेंज आणि डायमंडएक्स डॉट कॉम या नावांचा समावेश आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व पॅनेल एकाच मोठ्या नेटवर्कद्वारे बेकायदेशीर जुगार चालवण्यासाठी वापरले जात असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.


महादेव सट्टा सिंडिकेट के प्रमोटर्स इस समय 21 ऑनलाइन सट्टा ऐप संचालित कर रहे हैं।


या सिंडिकेटची कार्यपद्धती अत्यंत संघटित आणि क्रूर होती. सट्ट्याचे पैसे वसूल करण्यासाठी खेमानीने गुंडांची स्वतंत्र टीम तयार केली होती. जे ग्राहक पैसे देण्यास टाळाटाळ करत, त्यांना धमकावले जात असे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची बदनामी करण्याची धमकी दिली जात असे. काही प्रकरणांमध्ये तर सट्ट्याच्या पैशांच्या बदल्यात लोकांकडून सोन्याचे दागिनेही जबरदस्तीने घेतल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारांसाठी 'म्युल' खात्यांचा (दुसऱ्यांच्या नावे असलेली खाती) वापर केला जात होता, जेणेकरून तपास यंत्रणांना पैशांचा मागोवा घेणे कठीण जावे. गेल्या अडीच वर्षांपासून हे सिंडिकेट रेड्डी ग्रुप, बजरंग ग्रुप आणि डायमंड मास्टर यांसारख्या ऑनलाइन पॅनेलच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल करत होते.


पुलिस ने आरोपियों के पास बड़ी संख्या में मोबाइल जब्त किया है। साथ ही लैपटॉप भी बरामद किया गया है।


रायपूरमध्ये २०२६ मध्ये कमिशनर प्रणाली लागू झाल्यापासून ऑनलाइन सट्ट्यावर झालेली ही ११ वी मोठी कारवाई आहे. आतापर्यंत ७० पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून बीएमडब्ल्यू कारसह सुमारे ३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेले आर्थिक व्यवहार पाहता, पोलिसांनी आता सक्तवसुली संचालनालयाला (ED) पत्र लिहून या तपासात सामील करून घेण्याची विनंती केली आहे. सट्ट्याचा पैसा परदेशात पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले नेटवर्क आणि त्यामागील परकीय शक्तींचा छडा लावण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.


हेही वाचा