उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
52 mins ago
उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीरजम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज सोमवारी सकाळी एक अपघात झाला आहे.  एका प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जिल्ह्यातील एका दुर्गम गावातून उधमपूर शहराच्या दिशेने जात असताना रामनगर भागातील कागोर्ट गावाजवळ आली असता ही दुर्घटना घडली. सकाळी १० वाजेच्या सुमारास डोंगराळ रस्त्यावरून प्रवास करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस थेट १०० फुट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसचा अक्षरशः चक्काचूर झाला.

बस पलटते ही उसमें बैठे यात्री घायल होकर बाहर गिर गए। कुछ शव सड़क पर बिखर गए।

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एका धोकादायक वळणावर (ब्लाइंड कर्व्ह) बसला हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

accident

पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी उपस्थित असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.  जखमींना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा