
पणजी : साळगाव येथे घडलेल्या दुहेरी खून (Double murder) प्रकरणातील आरोपी जगन्नाथ भगत (रा. ओडिशा, Odisha)) याला गुन्हा शाखेच्या पथकाने अखेर अटक केली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात रिचर्ड डिमेलो (वय ६५) आणि अभिषेक गुप्ता (वय २५, मध्यप्रदेश) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र, गुन्हा शाखेने (Crime Branch, Goa) सातत्याने तपास करून आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्यात यश मिळवले. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून, या दुहेरी हत्येमागील नेमका हेतू आणि इतर संभाव्य धागेदोरे उलगडण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.