लईराई जत्रोत्सवासाठी वाहतुकीत बदल

वाहन पार्किंगसाठी जागा निश्चित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 11:31 pm
लईराई जत्रोत्सवासाठी वाहतुकीत बदल

पणजी : शिरगाव येथील देवी लईराईची वार्षिक जत्रोत्सवानिमित्त काही रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यानुसार थिवी बाजूकडून लईराई जत्रेसाठी येणारी चार आणि दुचाकी वाहने अस्नोडा येथील नवीन बाह्यवळण रस्त्याकडे वळवली जातील. या वाहनांचे पार्किंग याच नव्या बाह्यवळण रस्त्याच्या कडेला करण्यात येईल. थिवी बाजूकडून येणाऱ्या बसेसना अस्नोडा बस स्थानकाजवळ वळवले जाईल. येथून पुढे या बसेसना मुळगाव येथील जलस्रोत खात्याच्या मोकळ्या मैदानावर पार्किंगसाठी पाठवले जाईल.
याशिवाय डिचोली, साखळी आणि वाळपई बाजूकडून येणाऱ्या बस, चार आणि दुचाकी वाहनांना पैरा येथे वळवले जाईल. या वाहनांचे पार्किंग शिरगाव येथील लईराई मंदिरामागील जागा, साळगावकर आणि चौगुले खाणींच्या परिसरात केले जाईल. याशिवाय अस्नोडा कदंब बस स्थानक परिसरात चार आणि दुचाकी वाहने पार्क केली जातील. लईराई मंदिरामागील मोकळ्या मैदानावर चार आणि दुचाकी पार्किंग करण्यात येणार आहे. चौगुले खाण परिसरात चारचाकी तर साळगावकर खाण परिसरात चारचाकी आणि बस पार्किंग केले जाईल. वरील बदलांनुसार सर्व वाहनचालकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.              

हेही वाचा