स्टील पाईपच्या सहाय्याने आंबे काढताना वीज वाहिनीला स्पर्श; महिलेचा जागीच मृत्यू

तिळामळ-केपे येथील घटना.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
स्टील पाईपच्या सहाय्याने आंबे काढताना वीज वाहिनीला स्पर्श; महिलेचा जागीच मृत्यू

पणजी : तिळामळ परिसरात शुक्रवारी धक्कादायक घटना घडली. आंबे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा विजेचा तीव्र धक्का लागून मृत्यू झाला. नोकील ऑलिवेरा असे मृत महिलेचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोकील ऑलिवेरा तिळामळ येथील ओ' कॅरोलिना ओपन एअर हॉलमध्ये साफ सफाईचे काम करतात. शुक्रवारी दुपारच्या १.३०च्या सुमारास काम आटोपून आपल्या त्या काही सोबतिणींसह बाजूलाच असलेल्या आंब्याच्या झाडावरून  आंबे काढण्याचा प्रयत्न करत होत्या. ते काहीसे उंचावर असल्याने त्यांनी एक लांब स्टीलचा पाईप वापरला. मात्र, या दरम्यान त्यांच्या हातातील पाईप निसटला आणि तो वरून गेलेल्या वीज वाहिनीला लागला. पाईप धातूचा असल्याने त्यातून विजेचा प्रवाह वेगाने प्रवाहित झाला आणि नोकील ऑलिवेरा यांना विजेचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सध्या नोकील ऑलिवेरा यांचा मृतदेह सध्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केपेचे पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक दीपा देयेकर करीत आहेत. 


हेही वाचा