गोव्यात आयपीएल बेटिंगवर गुन्हा शाखेचे छापे; १२ जणांना अटक

३३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
गोव्यात आयपीएल बेटिंगवर गुन्हा शाखेचे छापे; १२ जणांना अटक

तिसवाडी : गोव्यात (Goa) आयपीएल बेटिंगविरोधात (IPL betting)  गुन्हा शाखेने (Crime Branch) गुरुवारी रात्री मोठी कारवाई करत तिसवाडीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत १२ जणांना अटक करण्यात आली आहे. सुमारे ३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल सामन्यांदरम्यान सुरू असलेल्या बेकायदेशीर बेटिंग रॅकेटची माहिती गुन्हा शाखेला मिळाली होती. त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने छापेमारी करण्यात आली. छाप्यादरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप तसेच बेटिंगसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बेटिंगवर अंकुश ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे गुन्हा शाखेकडून सांगण्यात आले. 

काल सांगोल्डा येथे धाड 

दरम्यान, काल सांगोल्डा येथे ऑनलाईन आयपीएल बेंटिग सुरू असल्याची माहिती मिळताच सायबर क्राईम शाखेने धाड टाकली होती. त्यात सहा जणांना अटक केली होती तर १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. 

हेही वाचा