गोव्यात पारा चढणार ! दोन दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
गोव्यात पारा चढणार ! दोन दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

पणजी : कर्नाटक (Karnataka)  आणि महाराष्ट्र (Maharashtra)  दरम्यान तयार झालेले टर्फ तसेच अन्य वातावरणीय कारणांमुळे गोव्यातील (Goa Weather) तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यानुसार हवामान खात्याने १५ आणि १६ एप्रिल रोजी उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

या दोन दिवसात कमाल तसेच किमान तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यातील हा पहिला उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert)  आहे. मागील वर्षी ४ ते ८ एप्रिल दरम्यान उष्णतेचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला होता. 

राज्यात १५ आणि १६ एप्रिल दरम्यान वातावरण उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे. मंगळवारी पणजीतील (Panjim)  कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान २५.९ अंश सेल्सिअस होते. मुरगावमध्ये कमाल तापमान अंश व किमान २५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील सहा दिवस किमान तापमान २४ ते २६ अंश तर कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली आहे. याआधी हवामान खात्याने एप्रिल महिन्यात कमाल तापमान सरासरी पेक्षा अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली होती.

हेही वाचा