म्हापसा मार्केटमधील व्यापाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा; पोलिसांनी प्रवेशद्वारावर रोखला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
म्हापसा मार्केटमधील व्यापाऱ्यांचा नगरपालिकेवर मोर्चा; पोलिसांनी प्रवेशद्वारावर रोखला

म्हापसा : म्हापसा मार्केटमधील ( Mapusa Market) प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा; या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे बुधवारी सकाळी मोर्चा काढला. शटर डाऊन आंदोलनातर्गंत काढण्यात आलेल्या या मोर्च्याला बाजारातून सुरूवात झाली. त्यानंतर मोर्चा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच पोलिसांनी रोखला. 

बाजारातील आपल्या दुकानांचे ‘शटर डाऊन’‘ करून या मोर्च्यात मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते. हातात फलक घेऊन व घोषणा देत व्यापाऱ्यांचा मोर्चा नगरपालिकेकडे पोहोचताच मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी प्रवेशद्वारावर रोखला. पोलिसांनी मोर्चा रोखल्यानंतर व्यापारी एकत्र जमून त्यांनी आपल्या समस्या याठिकारी जाहीररित्या मांडल्या.

बाजारातील समस्ये अनेकवेळा मांडून व नगरविकासमंत्री विश्वजीत राणे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मांडूनही अजून सुटल्या नाहीत. त्यामुळेच आज मोर्चा काढावा लागल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले. 

दरम्यान,  प्रलंबित प्रश्नांवर कोणताही ठोस तोडगा काढला जात नसल्याचे स्पष्ट करीत म्हापसा व्यापारी संघटनेने (Mapusa traders association) आज ’शटर डाऊन’ मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार हा मोर्चा काढण्यात आला.