दक्षिण गोव्यातील सात तालुक्यात १२ एप्र‌िलला वीज पुरवठा खंडित

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
दक्षिण गोव्यातील सात तालुक्यात १२ एप्र‌िलला  वीज पुरवठा खंडित

पणजी : दक्षिण गोव्यातील सात तालुक्यांना वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या २२०केव्ही व ११०केव्ही उपकेंद्रांच्या नियोजित देखभालीसाठी रविवारी १२ एप्रिल रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ४ या वेळेत वार्ष‌िक वीज शटडाऊन (Annual Shutdown)  करण्यात येणार आहे. 

या कालावधीत सासष्टी (Salcete) , काणकोण (Canacona), सांगे (Sanguem), केपे (Quepem), मुरगाव तसेच धारबांदोडा व फोंडा (Ponda) तालुक्यातील काही भागांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याचे आवाहन वीज विभागाने केले आहे.

दरम्यान, राय, कुडतरी, लोटली, माकाझान भाग या शटडाऊनमधून वगळण्यात आले असून, येथे वीजपुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे.

वीज विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. देखभालीची कामे वेळेत पूर्ण करून नियोजित वेळेनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असेही वीज खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.