पणजीत ८ एप्रिलला वीजपुरवठा खंडित

सहा तासांचा शटडाऊन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
51 mins ago
पणजीत ८ एप्रिलला वीजपुरवठा खंडित

पणजी : पणजी (Panjim) शहरातील वीज व्यवस्थेच्या देखभालीसाठी उद्या ८ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत वीजपुरवठा खंडित (Power Shutdown)  करण्यात येणार आहे. हा शटडाऊन ४०० केव्हीए नवे सचिवालय ट्रान्सफॉर्मरवर (Transformer)  करण्यात येणार आहे. 

या कालावधीत जुने सचिवालय (Old Secretariat)  परिसर, हॉटेल क्राउन, पाकीझा रेस्टॉरंट, हॉटेल विनंती, कमर्शियल टॅक्स कार्यालय तसेच आसपासच्या भागांमध्ये वीजपुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.  नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या वेळेनुसार, आपली नियोजित कामे करावीत, असे आवाहन वीज विभागाकडून करण्यात आले आहे.