इंधन टंचाई भासत असल्यास अमेरिकेकडून खरेदी करा : ट्रम्प

इराणविरुद्ध युद्ध निर्णायक टप्प्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
33 mins ago
इंधन टंचाई भासत असल्यास अमेरिकेकडून खरेदी करा :  ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (USA)  राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump)  यांनी राष्ट्राला संबोधित करत इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यांनी इराणी (Iran) शासनाला कडक इशारा देत अमेरिकन सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले आणि युद्ध लवकरच संपुष्टात येण्याचा दावा केला. होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे इंधन टंचाई भासत असलेल्या देशांना ट्रम्प यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला.

तसेच “धैर्य दाखवा आणि त्या जलमार्गावर नियंत्रण मिळवा,” असेही त्यांनी आवाहन केले. सध्या होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  या महत्त्वाच्या जलमार्गातील अडथळ्यांमुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला असून; कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही संकटाचे ढग दाटले आहेत.

ट्रम्प यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 ‘युद्ध लवकरच संपणार’

ट्रम्प यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे पूर्ण होतील. “आम्ही मोठी प्रगती केली आहे. लवकरच सर्व उद्दिष्टे पूर्ण होतील. दरम्यान चर्चा सुरू आहेत,” असे त्यांनी म्हटले. मात्र, इराणने यापूर्वी अशा चर्चांचा इन्कार केला आहे.

 ‘इराणची लष्करी ताकद उद्ध्वस्त’

‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ अंतर्गत अमेरिकन सैन्याने इराणच्या क्षमतेवर निर्णायक प्रहार केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. “इराणची नौदल शक्ती संपली आहे. हवाई दल उद्ध्वस्त झाले आहे आणि त्यांच्या नेत्यांचा अंत झाला आहे,” असा दावा त्यांनी केला.

 ‘अमेरिकेकडून तेल खरेदी करा’

होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे इंधन टंचाई भासत असलेल्या देशांना ट्रम्प यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला. तसेच “धैर्य दाखवा आणि त्या जलमार्गावर नियंत्रण मिळवा,” असेही त्यांनी आवाहन केले.

 ‘इराणचा धोका संपवण्याच्या उंबरठ्यावर’

“आमच्या कारवाईमुळे अमेरिका आणि जगासाठी असलेला इराणचा धोका संपवण्याच्या उंबरठ्यावर आहोत. लवकरच अमेरिकन नागरिक इराणी आक्रमण आणि अणु धमक्यांपासून मुक्त होतील,” असे ट्रम्प यांनी म्हटले.

इराणकडून चर्चेचा इन्कार

दरम्यान, ट्रम्प यांनी चर्चेचा दावा केला असला तरी इराणने कोणतीही थेट चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले आहे. होर्मुझ सामुद्रधुनी खुली होईपर्यंत युद्धविराम होणार नाही, असा इशाराही ट्रम्प यांनी यापूर्वी दिला होता.


हेही वाचा