पीडितांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याने दोघांना अटक : एक फरार

नाशिक : नाशिक (Nashik ) येथील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) लैगिंक अत्याचारप्रकरणातील (Sex scanndal) महिलांचे अश्लील व्हिडीओ सामाजीक माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी (Maharashtra Police) दोघांना अटक केली आहे. एक जण फरार आहे तर अनेकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अशोक खरात याच्याविरुद्ध ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडितांचे अश्लील (explicit) व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असल्याचे आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे पीडितांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक एसआयटी (SIT) मार्फत सुरू असून, नाशिकमधील अशोककुमार खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्याविरोधात सरकारवाडा वाडा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पीडित महिलांचे व्हिडिओ प्रसारित करणे हा गंभीर आणि कायद्याने दंडनीय प्रकार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केला असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागरिकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर न करण्याचे आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अशोक खरात विरोधात ८ गुन्हे नोंद; २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
दरम्यान; नाशिक लैंगिक अत्याचारप्रकरणात एसआयटी सखोल तपास करीत आहे. लैंगिक अत्याचार, खंडणी वसुली व अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याप्रकरणी अशोक खरात याच्याविरुद्ध ८ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
एसआयटीने खरातच्या लैंगिक अत्याचारप्रकरणाबरोबरच कमावलेली मालमत्ता, राजकीय लागेबांधे तसेच इतर प्रकरणांचा सखोल तपास सुरू केला आहे. त्यातून वेगवेगळी माहिती बाहेर येत आहे. त्याची कोट्यवधींची मालमत्ता व त्याचा स्त्रोत याची पडताळणीही तपास यंत्रणा करीत आहे. अशोक खरात याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.