आर्लेम सर्कलनजीक जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
23 mins ago
आर्लेम सर्कलनजीक जलवाहिनी फुटल्याने रस्त्यावर पाणी

मडगाव : फातोर्डा (Fatorda) येथील आर्लेम सर्कलनजीकची (Arlem circle)  मुख्य जलवाहिनी (Water pipeline) फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया गेले आहे. रस्त्यावर पाणी साचलेले असून; त्यातूनच वाहनचालक वाट काढत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून (PWD) जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

आर्लेम सर्कलनजीक जलप्रक्रिया प्रकल्पातून पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी सकाळी फुटली.  जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पाणी रस्त्यावरून वाहून जात होते व परिसरात साचले होते. याची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सध्या या जलवाहिनीतून  होणारा पाणी पुरवठा बंद केला आहे व दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनीही फातोर्डातील जनतेला जलवाहिनी फुटलेली असल्याने; पाण्याच्या पुरवठ्यात अडथळा आला असल्याचे कळीत केले आहे.  जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर तत्काळ पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा