
पणजी : गोव्यातील (Goa) धुळेर, म्हापसा (Mapusa) येथे गतिरोधकावर दुचाकी उसळून झालेल्या स्वयंअपघातात प्रज्वल करमलकर (२६ वर्षे, केरळ, Kerala) हा युवक ठार झाला. साखळी येथील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (Goa Institute of Management) हा युवक शिक्षण घेत होता.
अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांना (Police) माहिती दिली. रुग्णालयात (Hospital) नेल्यावर युवकाला मृत घोषित केले. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.
वाहने नियमांचे पालन करून चालवावीत
दरम्यान, वाढते अपघात व त्यात जाणारे बळी पाहून वाहन चालकांनी वाहने नियमांचे पालन करून चालवावीत; घरी आपले कुटुंबीय वाट पाहत आहेत हे लक्षात ठेवावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.