सरकारी कार्यालयांमध्ये उद्या होणार वंदे मातरम् चे समूह गायन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
17 mins ago
सरकारी कार्यालयांमध्ये उद्या होणार वंदे मातरम् चे समूह गायन

पणजी : वंदे मातरम् (Vande Mataram)  या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या इतिहासिक क्षणाच्या निमित्ताने उद्या २५ मार्चला सरकारी कार्यालयांमध्ये तसेच शैक्षरिक संस्थांमध्ये वंदे मातरमचे समूह गायन होणार आहे. 

सरकारी कार्यालये (Government Offices), शैक्षणिक संस्था (Educational institute), पंचायती (Panchayat), नगरपालिकांसहीत (Muncipality)  सार्वजनिक ठिकाणी २५ मार्चला सकाळी १०.१५ वाजता वंदे मातरम् चे  गायन करावे, असा आदेश सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी केला आहे. 

बंकीमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम गीताला १५० वर्षे पूर्ण होतात. त्यानिम‌ित्ताने ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ डिसेंबर २०२६ पर्यंत वर्षभर कार्यक्रम करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कार्यक्रमाचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर आता २३ मार्च ते ३० मार्च २०२६ पर्यंत तिसरा टप्पा होणार आहे.

शहीद दिनानिमित्त पुन्हा वंदे मातरमचे समूह गायन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यासाठी उद्या २५ तारखेला सरकारी कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांनी वंदे मातरम् चे समूह गायन होणार आहे. गायनाची ध्वनीफित वंदे मातरम् वेबसाईटवर उपलब्ध आहे. छायाचित्रासहीत कार्यक्रमाचा अहवाल २ एप्रिल पर्यंत कला आणि सांस्कृतिक संचालनालयाला इमेलवर पाठवून देणे आवश्यक आहे. 

हेही वाचा