फोंडा : ‘त्यांची’ पाकिटे घ्या, मत मात्र कॉंग्रेसलाच द्या!

आमदार एड. कार्लुस फेरेरा यांचे मिश्कील आवाहन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23rd March, 11:54 pm
फोंडा : ‘त्यांची’ पाकिटे घ्या, मत मात्र कॉंग्रेसलाच द्या!

पणजी : फोंडा पोटनिवडणुकीत (Ponda by election) आता ‘डर्टी पॉलिटिक्स’ सुरू होईल. आमच्या विरोधातील पक्ष दारूचे वाटप करेल, ती शक्यतो घेऊ नका. घेतलीच तर घरी ठेवा. पाकिटेही येतील, ती घ्या. पण मत मात्र कॉंग्रेसच्या उमेदवारालाच द्या, असे मिश्कील आवाहन कॉंग्रेसचे हळदोणेचे आमदार एड. कार्लुस फेरेरा (Congress MLA Carlos Ferreira) यांनी केले.

सोमवारी फोंडा येथील प्रशासकीय इमारतीत अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर (Ketan Bhatikar) यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आमदार कार्लुस फेरेरा यांना प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की​, केतन भाटीकर निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळेच फोंडा मतदारसंघात घाणेरडे राजकारण सुरू होणार आहे. दारू आणि ‘पाकिटां’चे वाटपही होईल. मतदारांनी त्या आमिषाला बळी पडू नये. ‘पाकिटे’ जरुर स्वीकारा, पण मत भाटी​कर यांनाच द्या.

दरम्यान, भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao) यांनी केला केला आहे. अशा जनविरोधी पक्षाच्या तावडीतून गोव्याला वाचवण्यासाठी मला विष प्यावे लागले तरी मी त्यासाठी तयार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.