मुख्यमंत्र्यांसहीत अनेक नेत्यांची उपस्थिती; मुख्यमंत्री भेटले विश्वनाथ दळवी यांना

पणजी : फोंडा (Ponda) पोटनिवडणुकीत (By-election) भाजपचे (BJP) उमेदवार माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांच्यासहीत भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वनाथ दळवी यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.
फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवत होता. रितेश नाईक यांनी भाजप नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्र्यांनी दळवी यांच्या निवासस्थानी दिली भेट
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपचे फोंडा येथील मूळ नेते विश्वनाथ (अपुर्व) दळवी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेऊन चर्चा केली. विश्वनाथ व त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. भाजपची उमेदवारी विश्वनाथ यांच्याऐवजी रितेश नाईक यांना मिळाल्याने; त्यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही भेट घेतली. विश्वनाथ दळवी हे भाजपचे मूळ कार्यकर्ते व जवळचे सहकारी असून, त्यांनी आपला पाठिंबा रितेश नाईक यांना दिला असल्याचे स्पष्ट केले.