
पणजी : फोंडा (Ponda) विधानसभा पोटनिवडणुकीत (By-election) काँग्रेस (Congress) पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर, आम आदमी पार्टीचे (आप) (Aap) गीतेश नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. आता पर्यंत फोंडा पोटनिवडणुकीसाठी तिघांनी अर्ज दाखल केले आहेत.
कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. केतन भाटीकर यांच्याबरोबर गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, विधिमंडळ नेते युरी आलेमाव, प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, आमदार अॅड. कार्लुस फेरेरा उपस्थित होते.
गीतेश नाईक यांचा अर्ज
दरम्यान, आम आदमी पार्टीतर्फे गीतेश नाईक यांनीही नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.