काँग्रेसबद्दल नाराजी; तरीही गोव्याच्या हितासाठी देऊ पाठिंबा : मनोज परब

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
37 mins ago
काँग्रेसबद्दल नाराजी; तरीही गोव्याच्या हितासाठी देऊ पाठिंबा : मनोज परब

पणजी : गोव्याचे हित जपण्यासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी फोंडा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करता काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय 'रिव्होल्युशनरी गोवन्स' (आरजी) पक्षाने घेतला आहे. मात्र, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आम्हाला गृहीत धरू नये, असा स्पष्ट इशाराही आरजीने दिला आहे.रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी रविवारी पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वीरेश बोरकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.



फोंडा पोटनिवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी 'आरजी'ची एक महत्त्वाची बैठक झाली. ही बैठक बराच वेळ चालली. आरजीचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी फोंडा पोटनिवडणूक लढवावी, असा विचार अनेक पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला. तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यापूर्वी काँग्रेसने आरजीशी कोणतीही चर्चा केली नाही, याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही भाजपचा पराभव करण्यासाठी आणि गोवा वाचवण्यासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय पक्षाने घेतल्याचे मनोज परब यांनी सांगितले. काँग्रेसने भविष्यात आरजीला गृहीत धरू नये; स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची धमक आरजीमध्ये आहे, असा इशाराही यावेळी पक्षाने दिला आहे.

हेही वाचा