४८ तासांत 'होर्मुझ' सर्वांसाठी खुली करा अन्यथा.. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणला अल्टीमेटम

खबरदार आगळिक केलीत तर; 'तेलापेक्षा पाणी महाग' करू ! इराणची डरकाळी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
48 mins ago
४८ तासांत 'होर्मुझ' सर्वांसाठी खुली करा अन्यथा.. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणला अल्टीमेटम

वॉशिंग्टन/तेहरान: अमेरिका आणि इराणमधील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडली असून, जगासमोर महायुद्धाचे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला असून, पुढील ४८ तासांत 'होर्मुजची सामुद्रधुनी' पूर्णपणे खुली न केल्यास इराणचे सर्वात मोठे वीज प्रकल्प (Power Plants) उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेत अमेरिकेसह त्यांच्या मित्रराष्ट्रांच्या सर्वात कमकुवत नसेवर बोट ठेवले आहे. इराणने स्पष्ट केले आहे की, जर त्यांच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ला झाला, तर आखाती देशांतील पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल. यामुळे आता केवळ इंधनच नव्हे, तर संपूर्ण अरब जगतात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.


The Gulf's Bigger Crisis Isn't Oil — It's What Comes After | Times Now


४८ तासांचा अल्टीमेटम आणि ट्रम्प यांची आक्रमक पोस्ट

डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला थेट इशारा दिला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जर इराणने कोणत्याही धमकीशिवाय होर्मुजची सामुद्रधुनी ४८ तासांच्या आत पूर्णपणे खुली केली नाही, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका इराणच्या विविध वीज प्रकल्पांवर हल्ले करून ते नामशेष करेल. या कारवाईची सुरुवात इराणमधील सर्वात मोठ्या वीज प्रकल्पापासून केली जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांच्यावर सध्या अमेरिकेत वाढत्या इंधनाच्या किमतींमुळे प्रचंड दबाव आहे. चालू महिन्यात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले असून, त्याला इराणने केलेली होर्मुजची नाकेबंदी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. जगातील एकूण तेल आणि वायू व्यापारापैकी सुमारे २० टक्के व्यापार याच मार्गावरून होतो. इराणने यापूर्वीच इशारा दिला होता की, ते अमेरिका आणि इस्रायलला जाणारे एक लिटर तेलही या मार्गावरून जाऊ देणार नाहीत.

.


इराणचा प्रतिहल्ला: पाणी संकट आणि 'डिसॅलिनेशन' प्लांट्सना बनवणार लक्ष्य

ट्रम्प यांच्या धमकीला इराणच्या 'खातम अल-अंबिया' ऑपरेशनल कमांडने सडेतोड उत्तर दिले आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जर शत्रूने इराणच्या इंधन आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचे उल्लंघन केले, तर या प्रदेशातील अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या सर्व ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी शुद्धीकरण (Desalination) प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल. आगळिक केलीत तर तेलापेक्षा पाणी महाग होईल, असा इशारा या पत्रकाद्वारे अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना दिला आहे. इराणचा हा इशारा सौदी अरेबिया, कुवेन आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या देशांसाठी धोक्याची घंटा आहे. हे देश पिण्याच्या पाण्यासाठी पूर्णपणे या मोजक्या प्रकल्पांवर अवलंबून आहेत. सौदी अरेबिया आपल्या ७० टक्के पिण्याच्या पाण्याची गरज याच प्रकल्पांतून भागवतो, तर कुवेतचे अवलंबित्व ९० टक्क्यांहून अधिक आहे. जर हे प्रकल्प उद्ध्वस्त झाले, तर अवघ्या काही दिवसांत या वाळवंटी प्रदेशातील मोठमोठी शहरे पाण्यावाचून ओसाड पडतील आणि एक भीषण मानवी संकट उभे राहील.


How the War in Iran Is Raising Concern About Water in the Middle East - The  New York Times


इन्फ्रास्ट्रक्चर वॉर: तेलापेक्षा पाणी अधिक महाग ठरणार?

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे युद्ध आता केवळ लष्करी तळांपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते 'इन्फ्रास्ट्रक्चर वॉर'मध्ये रूपांतरित झाले आहे. इराण आता प्रत्येक हल्ल्याचा बदला त्याच तीव्रतेने घेत आहे. जर इराणच्या तेल विहिरींवर हल्ला झाला, तर अरब देशांतील तेल आणि गॅस प्लांटवर हल्ले केले जात आहेत. मात्र, पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य करणे ही इराणची सर्वात मोठी रणनीतिक चाल आहे. सीआयएने (CIA) १९८३ मध्येच एका अहवालात इशारा दिला होता की, जर आखाती देशांतील वॉटर प्लांट्सवर हल्ला झाला, तर संपूर्ण प्रदेशात अराजकता माजेल. लोक मोठ्या प्रमाणावर शहरे सोडून पळू लागतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल. अलीकडेच इराणने असा आरोप केला होता की, अमेरिकेने त्यांच्या 'केशम' बेटावरील एका वॉटर प्लांटला लक्ष्य केले, तर बहरीननेही त्यांच्या प्लांटवर हल्ला झाल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे आता युद्ध थेट जीवनावश्यक गरजांवर येऊन ठेपले आहे.


Iran and the Arabian Peninsula depend on desalination plants to survive –  why water has become a target


जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवर होणारा परिणाम

अमेरिकन संरक्षण गुप्तचर संस्थेच्या अंतर्गत मूल्यमापनानुसार, इराण होर्मुजची सामुद्रधुनी एक ते सहा महिन्यांपर्यंत बंद ठेवू शकतो. जर इतका काळ हा मार्ग बंद राहिला, तर जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. दुसरीकडे, इराणचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत आमीर सईद इरावानी यांनी अधिक संतुलित भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इराणचा हा मार्ग बंद करण्याचा कोणताही इरादा नाही, परंतु आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा अधिकार इराणला आहे. मात्र, इराणचे नवीन सुप्रीम लीडर मोजताबा खमेनेई यांचे विधान अधिक जहाल असून त्यांनी होर्मुजचा वापर एक दबावाचे साधन म्हणून करण्याचे संकेत दिले आहेत. जर ट्रम्प यांनी दिलेला ४८ तासांचा इशारा अमलात आणला, तर मध्यपूर्वेतील युद्ध केवळ इंधनासाठी न राहता, ते पाण्यासाठी आणि अस्तित्वासाठी लढले जाणारे एक विनाशकारी युद्ध ठरेल.


The critical infrastructure that's so vital to Middle East nations – and  vulnerable to Iranian attack | The Independent

हेही वाचा