लष्कर-ए-तोयबाचा मुख्य रिक्रूटकर बिलाल सल्फीची पाकिस्तानात हत्या

मुरीदके येथील सुरक्षित मुख्यालयात शिरून अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
46 mins ago
लष्कर-ए-तोयबाचा मुख्य रिक्रूटकर बिलाल सल्फीची पाकिस्तानात हत्या

मुरीदके: पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांना बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरूच असून, आता लष्कर-ए-तोयबा (LeT) या कुख्यात संघटनेचा हाय-रॅंकिंग कमांडर बिलाल आरिफ सल्फी याची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लष्कर-ए-तोयबाचा गड मानल्या जाणाऱ्या मुरीदके येथील 'मरकज तैयबा' या अत्यंत सुरक्षित मुख्यालयाच्या आत घुसून अज्ञात हल्लेखोरांनी सल्फीला संपवले आहे.


 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंनुसार, बिलाल सल्फी हा नमाज अदा करून बाहेर येत असताना अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर चाकूने वार करून त्याची हत्या केली. या हल्ल्यामुळे मरकज तैयबाच्या परिसरात प्रचंड अफरा-तफरी माजली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सल्फीला वाचवण्याचे प्रयत्न तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी केले, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाले असून, अद्याप कोणत्याही गटाने या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली नाही.


లష్కర్-ఎ-తయిబా కీలక ఉగ్రవాది దారుణ హత్య | Most wanted Lashkar e Taiba  terrorist Mohammad Bilal Arif Salafi stabbed to death | Sakshi


बिलाल आरिफ सल्फी हा लष्कर-ए-तोयबाच्या नेटवर्कमधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात असे. तो केवळ एक कमांडर नव्हता, तर संघटनेचा मुख्य 'रिक्रूटकर'ही होता. संपूर्ण पाकिस्तानाच्या मागास भागातून तरुणांची ओळख पटवणे, त्यांना 'काश्मीर जिहाद'च्या नावाने कट्टरपंथी बनवणे आणि त्यांना कट्टर वैचारिक प्रशिक्षण देणे ही सर्व जबाबदारी सल्फीवर होती. मुरीदके येथील मरकज तैयबा या केंद्राचा वापर तो तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी तयार करण्यासाठी करत असे. त्याच्या मृत्यूमुळे लष्कर-ए-तोयबाच्या नवीन भरती प्रक्रियेला आणि रणनीतिक रचनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.


Bilal Arif Salafi Killed: LeT Commander Shot and Stabbed to Death by  Unknown Gunmen in Muridke; Disturbing Video Surfaces | 🌎 LatestLY


या हत्येच्या घटनेनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. लष्कर-ए-तोयबाच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुख्यालयात हा हल्ला कसा झाला आणि हल्लेखोर कोण होते, यावर अद्याप अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानात भारताचे शत्रू मानल्या जाणाऱ्या अनेक दहशतवाद्यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली आहे. बिलाल सल्फीची हत्या ही याच मालिकेतील पुढचा भाग असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानातील इतर दहशतवादी म्होरक्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


हेही वाचा