नाशिक सेक्स स्कॅंडलची ‘एसआयटी’मार्फत चौकशी सुरू

महिला आयोगाच्या अध्यक्षांवर राजीनाम्यासाठी दबाव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
50 mins ago
नाशिक सेक्स स्कॅंडलची ‘एसआयटी’मार्फत चौकशी सुरू

नाशिक : महाराष्ट्रातील (Maharashtra) नाशिक सेक्स स्कॅंडल प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे झाल्यानंतर राज्याचे राजकारण आता चांगलेच तापले आहे. याप्रकरणावरून विरोधकांकडून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Women Commission)  अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. वाढता दबाव पाहता महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची चौकशी ‘एसआयटी’कडे सोपवली आहे. आणि महिला आयपीएस अधिकारी तेजस्व‌िनी सातपुते यांची ‘एसआयटी’च्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. 

चाकणकर स्वत:चे बोट कापून घेतात!

रुपाली चाकणकर या कॅप्टन अशोक खरात चालवत असलेल्या संस्थेमध्ये सदस्या असल्याचे समोर आले होते. मात्र या प्रकरणात आता सर्वात मोठा दावा करण्यात आला असून, रुपाली चाकणकर या स्वत:च तंत्रमंत्र करत होत्या, असा थेट आरोप ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी केला आहे. एका पिडितेने सांगितले की, रुपाली चाकणकर स्वत:  तंत्रमंत्र विद्या करतात. त्या स्वत:ची अनामिका कापून घेतात.


हेही वाचा