देशाच्या तुलनेत गोव्यातील किरकोळ महागाई दर कमी

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
56 mins ago
देशाच्या तुलनेत गोव्यातील किरकोळ महागाई दर कमी

पणजी : मागील काही महिने गोव्यातील (Goa) ग्राहक (Consumer)  किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर हा अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक होता. मात्र फेब्रुवारी ( February) महिन्यात महागाई दर पुन्हा कमी होऊन २.१८ टक्के झाला. संपूर्ण देशात महागाई दर कमी असण्यात गोवा पाचव्या स्थानी राहिला. फेब्रुवारी महिन्यात देशातील महागाई दर ३.२१ टक्के राहिला. अन्नधान्य तसेच  तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती वाढल्याने जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीतील राष्ट्रीय महागाई दरात किरकोळ वाढ झाली आहे. 

केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने महागाई दर निश्चित करण्यासाठी २०२४ हे मूलभूत वर्ष ठरवले आहे. तसेच महागाई मध्ये अन्नधान्यांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. जानेवारी (January)  महिन्यातील महागाई दर या बदलानुसार काढण्यात आला होता. 

यापुढेही तो याच पद्धतीने काढण्यात येणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. खात्याच्या अहवालानुसार गोव्यात जानेवारी महिन्यात महागाई दर १.९२ टक्के होता. डिसेंबरमध्ये ३.१८ टक्के, नोव्हेंबरमध्ये ३.१४ टक्के, ऑक्टोबरमध्ये ३.४१ टक्के, सप्टेंबरमध्ये ३.८७ टक्के तर ऑगस्टमध्ये ३.८९ टक्के होता.  

फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर मागील दहा महिन्यातील सर्वाधिक ठरला आहे. फेब्रुवारी मध्ये मिझोराम येथील महागाई दर सर्वात कमी म्हणजेच ०.१ टक्के होता. यानंतर मणिपूर (१.०१ टक्के), जम्मू आणि काश्मीर (१.८६ टक्के), अरुणाचल प्रदेश (१.८९ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर तेलंगणा मधील महागाई दर सर्वाधिक ५.०२ टक्के राहिला. याशिवाय केरळ (३.५ टक्के), आंध्र प्रदेश (३.४५ टक्के), तामिळनाडू (३.४३ टक्के), मध्य प्रदेश (३.४३ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने अधिक होता.

हेही वाचा