गोव्यासाठी विष पिण्याचीही तयारी : युरी आलेमाव

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
30 mins ago
गोव्यासाठी विष पिण्याचीही तयारी : युरी आलेमाव

पणजी : भाजपने (BJP) लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव (Yuri Alemao) यांनी केला केला आहे.  अशा जनविरोधी पक्षाच्या तावडीतून गोव्याला वाचवण्यासाठी मला विष प्यावे लागले तरी मी त्यासाठी तयार असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले

फोंडा (Ponda) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (By-election) डॉ. केतन भाटीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर तीव्र टीका करताना युरी आलेमाव यांनी वरील वक्तव्य केले. 

 भाजप सरकारकडून “दादागिरी” आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांना प्रशासकीय इमारतीत प्रवेश दिला जातो तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जाणिवपूर्वक रोखले जात असल्याचे युरी आलेमाव म्हणाले. 

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या वारशाचा उल्लेख करत त्यांनी ते बहुजन, कुळमुंडकार आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटलेले नेते होते. हीच कॉंग्रेसची विचारधारा असून, आम्ही ती पुढे नेणार असे, युरी आलेमाव म्हणाले. फोंड्यात कॉंग्रेस सरकारांनी केलेल्या विकासकामांमुळे आम्ही ही जागा जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टीच्या (आरजी)  (Revolutionary Goans Party) पाठिंबब्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. हा विजयाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचे सांगितले. त्यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला पराभूत करण्यात मदत होणार असल्याचे युरी आलेमाव म्हणाले. 

हेही वाचा