
केपे : गोव्यातील (Goa) केपे (Quepem) येथे पोप जॉन शाळेजवळील (School) कालव्यात (Canal) कार कोसळली. त्यात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.
कार कोसळल्यानंतर या परिसरातील स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांनी गंभीर जखमी झालेल्या चालकाला कारमधून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली. अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी (Quepem Police) घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
वाहने जपून हाका; घरी कुटुंबीय वाट पाहत आहेत..
दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून व घरी आपले कुटुंबीय वाट पाहत आहेत, याची जाणिव ठेवून वाहने हाकण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.