आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सवर धाड; दोन घरगुती गॅस सिलिंडर जप्त

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21 mins ago
आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्सवर धाड; दोन घरगुती गॅस सिलिंडर जप्त

पणजी : काणकोण (Canacona)  नागरी पुरवठा खात्याने (Civil Supply Department) आगोंद समुद्रकिनाऱ्यावरील एका शॅक्सवर धाड टाकून दोन घरगुती गॅस ‌सिलिंडर (Gas Cylinder)  जप्त केले. 

व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅसचा बेकायदेशीर‌रित्या वापर करण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. काणकोण नागरी पुरवठा खात्याचे सहाय्यक संचालक उल्हास वेळीप, मामलेदार गजेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

दरम्यान, अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धामुळे व्यावसायिक गॅस ‌सिलिंडरची कमतरता असल्याने, हॉटेल, रेस्टॉरंट व तत्सम व्यवसाय चालवणाऱ्या व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्याने; व्यावसायिक काही ठिकाणी घरगुती सिल‌िंडरचा वापर करीत असल्याचे दिसून येताच नागरी पुरवठा खात्याने त्यावर देखरेख ठेवली आहे.

व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरण्यात येत असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पर्वरी येथे एका रेस्टॉरंटवर कारवाई करून घरगुती सिलिंडर नागरी पुरवठा खात्याने जप्त केले होते.