फणसाची भाजी

Story: चमचमीत रविवार |
21st March, 10:45 pm
फणसाची भाजी

साहित्य 

तुकडे केलेला १ मोठी वाटी कच्चा फणस

१ बारीक चिरलेला कांदा

खोबरे १/२ कप किसलेले

लसूण ४ पाकळ्या.

हळद  १/२ चमचा.

लाल तिखट १ चमचा.

धने-जिरे पावडर १ चमचा.

मोहरी १/२ चमचा.

कढीपत्ता ६-७ पाने.

तेल २ चमचे.

मीठ चवीनुसार.

कोथिंबीर  सजावटीसाठी.

कृती

सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी आणि कढीपत्ता घाला. मोहरी तडतडली की त्यात चिरलेला कांदा आणि लसूण घालून परतवा.

कांदा सोनेरी झाला की हळद, तिखट आणि धने-जिरे पावडर घाला.आता फणसाचे तुकडे घालून चांगले हलवा. थोडे पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवून १५-२० मिनिटे शिजू द्या.

शेवटी किसलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून परतून घ्या. गरम गरम फणसाची भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर खूप छान लागते.


संचिता केळकर