सावर्डेतून टिपर ट्रकची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
48 mins ago
सावर्डेतून टिपर ट्रकची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी : गोव्यातील (Goa) गांधीनगर, सावर्डे (Sanvordem)  येथे पार्क करून ठेवलेल्या टिपर ट्रकची (Tipper Truck) अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुडचडे पोलीस (Curchorem Police) स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुड्डेमळ, सावर्डे येथील रहिवासी रियाज देवगीरिकर यांचा टाटा कंपनीचा टिपर ट्रक हा राजेंद्र नाईक यांच्या गांधीनगर येथील जागेत ठेवला होता.  मात्र; ५ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजल्यापासून ते ६ मार्च सकाळी ७.१५ वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने हा ट्रक चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.  पुढील तपास कुडचडे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक मयूर पणशिकर करीत आहेत.

हेही वाचा